सुवर्णा कांचन

संपादक

पुणे: सोरतापवाडी (ता. हवेली) :

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत मंगळवार (ता. ४) रोजी येथील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या स्वयंप्रेरणा व सहभागातून गावातील धबधबी परिसरात वनराई बंधारा बांधण्यात आला.

या उपक्रमामुळे परिसरातील जलसंधारणाला चालना मिळून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच यामुळे भूजलपातळी वाढण्यास हातभार लागेल.

विशेष म्हणजे, या कामासाठी कोणताही शासकीय निधी न वापरता ग्रामस्थांनी लोकसहभागातून आणि श्रमदानाच्या माध्यमातून हे कार्य पूर्ण केले आहे. ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन आणि जलसंपदा टिकवण्यासाठी सोरतापवाडी ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट आणि उत्साह हा आदर्श ठरला आहे.

या उपक्रमात ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, सरपंच सुनिता कारभारी चौधरी, उपसरपंच विलास शंकर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सनी चौधरी, कारभारी चौधरी, नवनाथ आढाव, ग्राम कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *