पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील टिळेकर मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षिका श्रीमती सारीका कांचन ताटे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षण, प्रेम, शिस्त आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण करून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत करून त्यांचे शाळा परिवारात सहर्ष स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला उरुळी काचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “प्राथमिक शिक्षण हीच व्यक्तिमत्त्व विकासाची खरी शाळा असते. संघर्षाशिवाय यशाचा मार्ग तयार होत नाही. आम्हीही याच शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्याच शिक्षणाने जीवनात उभं राहण्याची ताकद दिली. विद्यार्थी परिश्रम, शिस्त आणि ध्येय ठेवून वाटचाल करतील, तर भविष्यात कोणतेही पद दूर राहत नाही.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी संजय टिळेकर होते. या सोहळ्याचे आयोजन आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले आणि ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र टिळेकर यांनी केले होते.

कार्यक्रमास मुख्याध्यापक मोरे सर, शिक्षिका सुवर्णा रसाळ, रेखा फिरोज शेख, शिक्षक संतोष वनकुद्रे, रामचंद्र केशव टिळेकर, मिलिंद जगताप, पोपराव ताम्हाणे, बाळासाहेब चौवरे, दिपक टिळेकर, विजय टिळेकर, तसेच पत्रकार अमोल भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शाळेतील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मान्यवरांनी सारीका ताटे यांच्या कार्याचे कौतुक करत आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संयोजन शाळा परिवाराने केले तर सूत्रसंचालन राजेंद्र टिळेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *