पुणे: अष्टापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अतुल कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उच्चांकी रक्तदान झाले. तसेच आरोग्य शिबिर, महा-ई-सेवा अंतर्गत शासकीय योजना, तसेच आर.टी.ओ. मार्फत ड्रायव्हिंग लायसन्स आदी सेवा मोफत देण्यात आल्या. गावकऱ्यांनी या सर्व उपक्रमांना उत्साहाने प्रतिसाद दिला.
या प्रसंगी माजी अध्यक्ष सुखदेव कोतवाल यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यप्रेरणेने अतुल कोतवाल जनसेवेसाठी सातत्याने कार्यरत असल्याचे मान्यवरांनी सांगितले. “तरुणांनी जनहिताचे कार्य करत वाढदिवस साजरे करावेत,” असे श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी शुभेच्छा देताना सांगितले.
कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोरशेठ उंद्रे, माजी अध्यक्ष सुखदेव कोतवाल, अभिमान कोतवाल, संचालक लिंबाजी जगताप, केरबा कोतवाल, उपसरपंच संजय कोतवाल, पोलिस पाटील कैलास कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
“जनतेसाठी अशाच सेवा व विकास उपक्रमांची मालिका पुढेही सुरू राहील,” असे अध्यक्ष अतुल कोतवाल यांनी सांगितले. सर्व रक्तदाते, युवकवर्ग व महिला भगिनींच्या उपस्थितीबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.