पुणे: पूर्व हवेलीतील उरुळी कांचन येथे नुकत्याच पार पडलेल्या शाहू-फुले-आंबेडकर चषक २०२५ या रोमांचक क्रिकेट स्पर्धेत गणराज फायटर्स संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद विकास दादा दौंडकर वॉरिअर, तृतीय क्रमांक जितू भैय्या बडेकर फायटर्स तर चतुर्थ क्रमांक जय भवानी वॉरिअर यांनी मिळवला. स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज अली अन्सारी, उत्तम फलंदाज प्रविण गायकवाड, उत्तम गोलंदाज बबलू साळुंखे, क्षेत्ररक्षणात चमक दाखवणारे निखिल कोतवाल, तर उत्कृष्ट टेपबॉल गोलंदाज प्रज्वल कड ठरले.

अंतिम सामन्यातील पहिल्या डावात प्रविण गायकवाड यांनी दमदार सुरुवात केली. त्यांच्यासोबत अमोल थोरात यांची खेळीही आकर्षक ठरली. प्रविण बाद झाल्यानंतर प्रज्वल कडच्या टेपबॉल गोलंदाजीने सामना रंगात आला. शेवटच्या षटकांत अमोलने स्फोटक फटकेबाजी करत २९ चेंडूत ५६ धावा केल्या. गणराज फायटर्ससमोर ८ षटकांत ८४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

उत्तरदायी फलंदाजीसाठी उतरलेल्या गणराज फायटर्सकडून सचिन जगताप यांनी दोन चौकारांसह दमदार सुरुवात केली. मात्र मधल्या काळात काही झेलबाद प्रसंग घडले. तरीही निखिल कोतवाल यांनी संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ करत संघाला स्थिरता दिली. दुसरीकडे, विकास दादा दौंडकर वॉरिअर यांचे क्षेत्ररक्षण मात्र निर्णायक क्षणी ढासळले. एका धावेवर दोन धावा देण्याच्या घटना वारंवार झाल्या आणि त्याचा सामना परिणामावर मोठा प्रभाव पडला.

शेवटच्या षटकात फक्त ५ धावांची गरज असताना निखिल कोतवाल यांनी दबावाला न जुमानता अचूक फटकेबाजी केली. अखेरीस १९ चेंडूत ४१ धावांची खेळी करत त्यांनी चौकारासह संघाचे विजेतेपद निश्चित केले. संघमालक डॉ. समीर ननावरे यांच्या नेतृत्वाखाली गणराज फायटर्सने शानदार विजय मिळवला.

संपूर्ण स्पर्धेत योगदान देणाऱ्या सर्व खेळाडू, संघमालक, मार्गदर्शक, प्रेक्षक आणि क्रिकेटप्रेमी यांचे स्मॅश क्रिकेट क्लबतर्फे आभार मान्यता आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *