सुवर्णा कांचन
संपादक

पुणे : नागपूर शहर पोलिस दलाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी आपल्या दुर्मीळ आणि प्रेरणादायी पर्वतारोहण कामगिरीमुळे देशभरात मानाचा तुरा मिळवला आहे. त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (८८४८.८६ मीटर) सहित मकालू (८४८५ मीटर), मनासलू (८१६३ मीटर) आणि ल्होत्से (८५१६ मीटर) अशी आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीची चारही हिमालयीन शिखरे सर केली आहेत.

ही चारही शिखरे यशस्वीरीत्या सर करणारे ते देशातील एकमेव पोलिस अधिकारी ठरले असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२५’ मध्ये करण्यात आली आहे.

एपीआय ननवरे यांच्या या यशाबद्दल नागपूर शहर पोलिस आयुक्त मा. रवींद्र कुमार सिंगल (भा.पो.से.), पोलीस सहआयुक्त मा. नवीन चंद्र रेड्डी, अप्पर पोलिस आयुक्त मा. रवींद्र सिंग परदेशी, पोलिस उपायुक्त मा. राहुल माकणीकर, तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त मा. डॉ. अभिजीत पाटील आणि सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक श्री. राहुल शिरे यांनी त्यांच्या हस्ते विशेष सत्कार करून अभिनंदन केले.

एपीआय ननवरे यांच्या या दुर्मीळ पर्वतारोहण मोहिमेमुळे महाराष्ट्र पोलिस दलासह नागपूर पोलिसांचे नाव भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उज्ज्वल झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *