पुणे : मुंढवा पोलिसांनी हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकून बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. कारवाईत तब्बल १ लाख ८ हजार ८०० किमतीचा मोनो फिलगोल्ड कंपनीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आयुष राहुल शिदे (वय २०, रा. ससाणेनगर, हडपसर), यशराज विजय दिवेकर (वय २०, रा. हिंगणे मळा, हडपसर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अंमलदार शिवाजी जाधव व योगेश राऊत यांना वरील दोघांकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक युवराज पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सापळा रचत हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात कारवाई केली.

या दोघांकडेही मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांज्याच्या रील्स आढळून आल्या. त्यानंतर मुंढवा पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३१३/२०२५ प्रमाणे भा.दं.सं. २२३, ३(५) तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५१५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उद्‍द्मले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम सहा. पो. नि. राजू महानोर, पो. उपनिरीक्षक युवराज पोमण यांच्यासह अन्य पोलीस अंमलदारांचा समावेश होता.

पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज पोमण करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *