पुणे : पूर्व हवेलीतील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखानाचे सर्व सभासदांच्या सार्वजनिक मालकी हक्काची ५१२ कोटींची ९९.२७ एकर जमीन मिळकत आपापसात संगनमताने कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या करिता विक्री व्यवहार करण्याच्या बहाण्याने दोन्ही संस्थांच्या अध्यक्ष, सचिव व संचालकांनी बनाव करुन स्वतःच्या आर्थिक लाभासाठी अत्यल्प किमतीला तबदिल करण्यासाठी बनावट व खोटी कागदपत्रे बनवून ती खरी असल्याचे शासनास भासवून ३६ कोटी ५० लाख रु. परपसर बँक खात्यात वर्ग केलेल्या रक्कमेचा अपहार, गैरव्यवहार, दलाली करण्यासाठी मयत सभासदांना जिवंत असल्याचे भासविले. बिगर सभासद आणि मयत व्यक्ति जमीन विक्री ठराव सभेत उपस्थित असल्याचा बनाव करुन त्यांच्या नावाचा दुरुपयोग करुन मयत व्यक्तींच्या खोट्या सह्या करुन बनावट कागदपत्राच्या आधारे सभेचे कामकाज बनावट व खोटे दिशाभूल करून प्रोसीडिंग तयार करुन सभासदांची व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने अध्यक्ष विकास लवांडे, अलंकार कांचन, लोकेश कानकाटे, सूर्यकांत काळभोर, राजेंद्र चौधरी, सागर गोते यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

याबाबत योग्य तो तपास केला जाईल, असे लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्याकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *