पहिल्या टप्प्यात १० बेघर महिलांना रोजगार

पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि बेघर महिलांना स्वावलंबी करण्याच्या उपक्रमात बंधन कोननगर संस्थेने बजाज फिनसवर्हच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लोणी काळभोर शाखेत आयोजित कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात १० निराधार महिलांना मोफत रोजगार साहित्याचे वाटप करण्यात आले.

या महिलांना कापड दुकानासाठी लागणारी वस्तू, किराणा साहित्य, शिलाई मशीन, तयार कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने आणि इतर व्यवसायासाठी उपयोगी साहित्य देण्यात आले. या उपक्रमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवण्यास हातभार लागणार आहे.

पुणे जिल्ह्यातील १० शाखांमध्ये एकूण २००० महिलांना मोफत व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा बंधन कोननगर संस्थेचा मानस असून, या सर्व महिलांना दोन वर्षांपर्यंत संस्थेकडून सहाय्य दिले जाणार आहे. शिरूर आणि सोलापूर जिल्ह्यातही हा उपक्रम राबवला जात आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डाळिंबचे आदर्श उपसरपंच सजेंराव म्हस्के, उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब मत्रे, डाळिंब महिला बचत गटाच्या सीआरपी शितल काळे, बंधन कोननगरचे राजेंद्र घोषाल, राज्य अधिकारी आमुत घोष, जिल्हा प्रभारी तेजसिंग चव्हाण, क्षेत्र प्रभारी–शाखा प्रमुख प्रविण कुमार आणि फिल्ड अधिकारी अनिल कुमार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *