औंध (पुणे) : भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त औंध येथील गोळवलकर शाळेत भव्य बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि उपक्रमांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांमध्ये कैलास गायकवाड – मा. नगरसेवक, पुणे मनपा व मा. अध्यक्ष, विधी समिती, आदिती गायकवाड – कडू पाटील, सरचिटणीस, पुणे शहर युवक काँग्रेस, संकेत कडू पाटील – उद्योजक, हर्षद हांडे – सरचिटणीस, पुणे शहर युवक काँग्रेस, मा. अॅड. रमेश पवळे – ज्येष्ठ नेते, काँग्रेस, जनसेविका रेखा संजय अगरवाल, करीम तुर्क, मोहम्मद शेख, संजय अगरवाल, सुंदर ओव्हाळ, साजिद शेख, विकास कांबळे, अमित आगरवाल, मदान मारुडा, तानाजी अमृतसागर, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अमित चौगुले, सचिन चौगुले, विजय जगताप, अनिल गायकवाड यांचा समावेश होता.
मान्यवरांनी मुलांना प्रोत्साहन देत नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कार्याची आठवण करून दिली. बालमेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
