पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू असून निवडणूक आयोगाने नोंदणीची अंतिम तारीख वाढवून १० डिसेंबर २०२५ अशी जाहीर केली आहे. वाढीव मुदतीचा लाभ घेऊन सर्व पात्र पदवीधरांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन प्रा. अजय गाढवे यांनी केले आहे.
या संदर्भात बोलताना प्रा. गाढवे म्हणाले, “पदवीधर मतदारसंघ हा सुशिक्षित मतदारांचा मजबूत आवाज आहे. धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत या मतदारसंघाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र पदवीधराने वेळेत नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.”
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड / मतदान ओळखपत्र
- पदवी प्रमाणपत्र / गुणपत्रिका
- नावात बदल असल्यास गॅझेट प्रत ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
पदवीधरांनी आवश्यक कागदपत्रांसह www.mahaelection.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करून नोंदणी पूर्ण करू शकतात.
मतदार याद्यांचे वेळापत्रक
६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्राप्त अर्जांची प्रारूप मतदार यादी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर
अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार
प्रा. गाढवे यांनी पुणे विभागातील महाविद्यालयीन माजी विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील पदवीधरांना नोंदणीसाठी सक्रियपणे प्रोत्साहित केले आहे. अनेकांना नोंदणी प्रक्रियेत मदत करत असल्याचे सांगत, “जे अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत त्यांनी तातडीने अर्ज करावा,” असे त्यांनी आवाहन केले.
