पुणे : बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तत्पर कारवाईत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन सराईत आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत दरोड्याचे साहित्य आणि चोरीचे मोबाईल फोन असा एकूण ३२ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नसरुद्दीन शेख (वय ३२), सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (वय ३५) आणि शिवप्रकाश कुमार (वय २३) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांच्या पथकास माहिती मिळाली की, जुने रेल्वे सिमेंट गोडाऊन, मालधक्का चौक परिसरात काही इसम दरोड्याची तयारी करत थांबले आहेत. माहितीची पडताळणी करून पथकाने तत्काळ छापा टाकला. या छाप्यात जानमोहम्मद शेख, सतीश शिरोळे, शिवप्रकाश कुमार या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडतीत घेतली असता त्यांच्या जवळ दरोड्याचे साहित्य आणि सहा मोबाईल फोन आढळून आले. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक ३५२/२०२५ भादंवि कलम ३१०(४), ३१०(५), आर्म अ‍ॅक्ट ४(२५) व म.पो. अधि. ३७(१)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान या आरोपींकडून गुन्हा क्रमांक ३५०/२०२५ मधील भादंवि कलम ३०९(६), ३(५) प्रमाणेचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला. त्यातून चोरीचे मोबाईल आणि साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ही ३२ हजार १६० इतकी आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलिस आयुक्त संगिता आल्फान्सो-शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) निलकंठ जगताप यांच्या सुचनेनुसार पीएसआय धीरज गुप्ता व त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *